तुळस एक अत्यंत गुणकारी औषधी .

भारतीय समाजात तुळशीला मनाचे स्थान आहे. समुद्र मंथनातून जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले ,त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते.प्रत्येकाच्या दरी तुळशी वृंदावन असतेच. नित्यनियमाने त्याची पूजा केली जाते. सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. देवळात परमेश्वराला तुळसीपत्र वाहिले जाते. पूजाविधीमध्ये एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या ऐवजी तुळशीचे पान वाहिले जाते. श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय असे मानले जाते.

पंढरपूरच्या विठोबाची पूजा करताना त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालतात.तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे असेही मानले जाते.

सत्यनारायणाच्या पूजेत एक हजार तुळशी पत्रे वाहून ते दिले जाते. देवाला नैवेद्य दाखवताना एक तुळशीचे पान नैवेद्यावर ठेऊन , दुसऱ्या तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवला जातो व नंतर ते पान देवाला वाहिले जाते. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या मृतदेहाच्या तोंडात, देहावर, कपाळ पट्टीवर आणि दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवले जाते.

भारतीय समाजात तुळशीला एवढे मनाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध होते. तुळस ही कफ नाशक व पाचक आहे. सर्दी, पडसे, कफ खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे .तुळशीची पाने, आले व गुळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो.चहा, कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले. तुळशीची पाने जेवल्यावर खाल्यास पचन चांगले होते. तुळसी रस कायम प्राशन केल्यास मूत्रपिंडाची क्षमता वाढते. रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होते. कोलायटीस , अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कडे, मेदवृद्धी,डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत. स्मरण शक्ती वाढण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिऱ्या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्यात पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लाघवी स्वच्छ होते.

वृन्दावनी, विश्वपुजीता, पुष्पसारा कृष्णजीवनी अशा नावाने ओळखली जाणारी तुळस ही एक झुडूप वजा वनस्पती आहे.ती ३-४ फुट इतकी उंच वाढू शकते. त्याला एक विशिष्ट सुगंध असतो. या रोपट्यावर भ्रमर झेपावत नाहीत , फुलपाखरे भिरभिरत नाहीत.आणि पाखरे आपली घरटी बांधत नाहीत.पंढरी तुळस आणि कृष्ण तुळस असे याचे २ प्रकार आहेत. त्यापैकी कृष्ण तुळस औषधी असते. तुळशीचे औषधी गुण आणि धार्मिक भाव यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचे स्थान आहे.

PC:Unknown

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu